VIRAJ E-MOTORS : Pune, Maharashtra

Benling Bike Showroom

Contact details and address of VIRAJ E-MOTORS.

Showroom Contact Details

  • Contact Person
  • --
  • Phone
  • --
  • Fax
  • --
  • E-Mail
  • anant.kalkute@grgreenlife.com
  • Address
  • Tamhani chowk ,
    opp Tatyacha Dhaba ,
    Aundh Baner Link Road
    Pune, Maharashtra, India
    Pin Code - 411045
  • Working Days & Hours
  • --
Rate VIRAJ E-MOTORS :
3.5/5 (2 votes)


Book A Test Drive
Book online through Bikes4Sale and we will try to get you the best offer.
+91-
By submitting, you agree to our Terms & Conditions.
15394
Latest Comments. Share Your Opinion
पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे चार चाकी गाडी घेऊन बाहेर जाणे जिकरीचे झाले आहे. दैनंदिन प्रवास सुखर व्हावा म्हणून दोन चाकी चा पर्याय आपण स्वीकारतो. आज तापमान वाढ, महाग पेट्रोल, त्यासाठी खर्च होणारे देशाचे चलन याचा विचार करून बहुतांशी नागरिक इलेक्ट्रिक बाईक चा विचार करू लागले आहेत .मी ही तोच विचार केला आणि सप्टेंबर 2022 ला विराज इलेक्ट्रिकल, बाणेर इथून aura benling गाडी खरेदी केली. इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना तुम्हाला मदत व्हावी या हेतूने माझा अनुभव सविस्तर लिहीत आहे.विराज शोरूम मधुन बाईक खरेदी करण्यापूर्वी

1)त्यांनी मला गाडीची किंमत एक लाख वीस हजार रुपये सांगितली. आणि asessories ची किंमत सात ते आठ हजार रुपये होईल असे सांगितले. तुमच्यासाठी म्हणून सात ते आठ हजार कमी करतो म्हणजेच ॲक्सेसरीज मोफत देतो असे त्यांनी सांगितले.

मुळात सर्व ॲक्सेसरीज सहित गाडीची किंमत एक लाख वीस हजार आहे. सर्व ॲक्सेसरीज या कंपनीकडून गाडीबरोबरच येतात. ग्राहकांनी बार्गेनिंग करू नये म्हणून ते ॲक्सेसरीज वेगळे येतात असं सांगत असावेत.

2) गाडी खरेदी करताना पहिले तीन सर्विसिंग मोफत असतील असं त्यांनी सांगितलं होतं. गाडीबरोबर येणाऱ्या सर्विस बुक मध्येही तसे लिहिलेले आहे.

असं असतानाही पहिल्या सर्विसिंगला त्यांनी (विराज शोरूम, बाणेर )माझ्याकडे सातशे रुपयांची मागणी केली. नाय हो करता करता वॉशिंग चे 80 रुपये घेतले. पहिल्या तीन सर्विसिंगला कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही असा शब्द गाडी खरेदी करताना त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हने दिला होता. शिवाय सर्विस बुक मध्ये ही तशी नोंद आहे. असं असतानाही 80 रुपयासाठी त्यांनी(विराज शोरूम, बाणेर ) व्यावसायिक नीतिमत्ता गुंडाळून ठेवली.

3) दुसऱ्या सर्विसिंग ला गेलो असता पुन्हा सातशे रुपयांची मागणी करण्यात आली. याही वेळी 80 रुपये घेऊन सेटलमेंट केली. पहिल्या तीन सर्विसिंगला ग्राहकांकडून कसलेही पैसे घेऊ नये अशी सर्विस बुक मध्ये नोंद आहे. ती त्यांना दाखवली तरीही त्यांनी 80 रुपयाची पावती बनवली आणि मला दिली.

3) दिनांक 24 मार्च 2023 ला तिसऱ्या सर्विसिंग साठी दुपारी बारा वाजता गाडी सोडली.तत्पूर्वी दोनदा गेलो असता कामाचा लोड आहे नंतर या असे सांगण्यात आले.त्यांनी शब्द दिलेला 25 तारखेला गाडी देतो. आज रोजी संध्याकाळी 4 वाजता गाडी घ्यायला गेलो असता काम झाले नाही असे सांगितले.

मालकाकडे गेलो असता, काम मोठे आहे,गाडी खोलून ठेवलेली आहे, उद्या मिळेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात गाडी जशी जमा केली तशीच उभी होती. मी गाडी घेऊन आलो. मालक आणि कामगार यांचे खोटं मी पकडलं. उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही. विरार शोरूम बाणेर हे सोडून तुम्ही कुठे जाताय असा त्यांचा भाव होता.

4) निघताना शोरूम मालकाला, गाडी पुन्हा कधी आणून देऊ हे फोनवर सांगा असं म्हणालो असता त्यांनी त्यास असमर्थता दाखवली. हे मला पूर्णपणे अनपेक्षित होते.

इलेक्ट्रिक बाइक खरेदी करत असाल तर

👉 बजाज किंवा टीव्हीएस कंपनीचा विचार करावा. त्यांच्याकडे सर्विस ला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. ब्रँड ब्रँड असतो हे शहाणपण मला आले.

👉Aura (benling ) मी स्वतः सहा महिने वापरतो आहे. गाडी मला ठीक वाटली. परंतु विराज शोरूम बाणेर, यांच्याकडून आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे.

👉 ग्राहकाने गाडी खरेदी केल्यानंतर विराज शोरूम, बाणेर यांचे व्यवस्थापन जुन्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करते असा माझा अनुभव आहे.

👉 बिनधास्त खोटं बोलून ग्राहकाला ताटकळत ठेवणे हे मी विराज शोरूम बाणेर यांच्याकडून अनुभवले.

👉 गाडी खरेदीच्या पावत्या, अनैतिक रित्या वॉशिंगचे घेतलेले पैसे याच्याही पावत्या माझ्याकडे आहेत. जिज्ञासूंना शहानिशा करायचे असल्यास, किंवा विराज शोरूम बाणेर यांच्या सर्विस विषयी चा सखोल अनुभव हवा असल्यास ई-मेल करू शकता.

( वैयक्तिकरित्या संपर्क करण्यासाठी- stapkir30@gmail.com )
By on 25-03-2023
Add Your Comment
Name :

Comment :

8964




Corrections ?

For adding or editing the information given in this page OR to upload photos of the Dealership, please send us an email with details.